May 24, 2019
HW Marathi
राजकारण

शिवसेनेच्या महिला आघाडी-युवासेनेने अयोध्येत येऊ नये | ठाकरे

मुंबई | शिवसेनेच्या महिला आघाडी आणि युवासेनेने अयोध्येत येऊ नये, असे आदेश आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. २५ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. ठाकऱ्यांनी अयोध्येत कोणताही अनुचित प्रकार घडून नये यांची खबरदारी म्हणून हा निर्णय घेला असल्याचे म्हटले जाते. अयोध्येत ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

यावेळी भाजप नेहमीच राम मंदिराच्या मुद्यांवर निवडणुका लढवून जिंकते. यावर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधतात म्हटले की, शिवसेनेने “हर हिंदुकी एकही पुकार..पहिले मंदिर फिर सरकार”, असा नवा नारा  दिला आहे. या पार्श्वभुमीवर ठाकऱ्यांनी अयोध्या दौऱ्याच्या तयारीची माहिती देण्यासाठी महत्त्वाची बैठक आज (१८ नोव्हेंबर)ला  सेनाभवनात पार पडली आहे. यावेळी राज्यातील शिवसेनेचे सर्व जिल्ह्याप्रमुख, संपर्कप्रमुख आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

Related posts

लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना नराधमांना मृत्यूदंड

News Desk

महिला आहे म्हणून नव्हे तर सत्तेत आहे म्हणून ट्रोलिंग !

News Desk

राज ठाकरेंना पुन्हा एक मोठा धक्का | राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांचा राजीनामा

News Desk