HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

‘महापोर्टल’ बंद करा, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शासकीय नोकरभरतीसाठी याआधीच्या सरकारने सुरु केलेले ‘महापोर्टल’ बंद करावे, अशी मागणी केली आहे. ‘महापोर्टल’ या सेवेत पारदर्शकता नसून अनेक उमेदवारांच्या तक्रारी आल्याने ते बंद व्हावे ही मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे, आम्ही मुख्यमंत्र्यांकडे राज्यातील युवकांसाठी याहून चांगले पोर्टल उपलब्ध करून देण्याची मागणी केल्याचे देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले आहे.

राज्य सरकारच्या नोकरभरतीच्या परीक्षा या महापोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातात. मात्र, अनेक उमेदवारांकडून या महापोर्टलबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्याने सुप्रिया सुळे यांनी हे पोर्टल बंद करून सरकारने राज्यातील तरुणांसाठी यापेक्षा नवे आणि चांगले पोर्टल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यावेळी आपल्या या मागणीला शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील पाठिंबा दिल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

राज्यातील महायुती सरकारने सुरु केलेल्या या महापोर्टलच्या विरोधात राज्यभरातील अनेक उमेदवारांकडून अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या. या पोर्टलविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन देखील झाली. या पोर्टलमुळे कोणत्याही योग्य किंवा पात्र उमेदवारावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, यासाठी आता सुप्रिया सुळे यांच्याकडून हे पोर्टल बंद करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

Related posts

आगामी लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपची युती होणारच !

News Desk

कॉग्रेसने मोदी सरकारकडे केल्या ‘या’ १० मागण्या

rasika shinde

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

rasika shinde