HW News Marathi
राजकारण

सिद्धू हे काँग्रेसची प्रतिमा मलिन करत आहेत !

नवी दिल्ली | “सिद्धू हे काँग्रेसची प्रतिमा मलिन करत आहेत. पक्षाने त्याच्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे. सिद्धू हे पंजाबचे मुख्यमंत्री होऊ इच्छित आहेत”, असे म्हणत काँग्रेस नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर निशाणा साधला आहे. अमरिंदर सिंग यांनी पतियाळा येथे मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सिद्धू यांच्यावर हे आरोप केले आहेत. दरम्यान, अमरिंदर सिंग यांच्या या विधानामुळे पंजाब काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

“नवज्योत सिंग सिद्धू यांच्याविरोधात कारवाई करावी की नाही, हे पक्षाच्या हायकमांडने ठरवावे. परंतु, त्यांनी शिस्तभंग केल्यास काँग्रेसने ते सहन करू नये. माझी सिद्धू यांच्याविरुद्ध वैयक्तिक तक्रार नाही. मी त्यांना बालपणापासून ओळखतो. ते महत्त्वाकांक्षी आहेत. नवज्योत सिंग सिद्धू पंजबाचे मुख्यमंत्री बनू इच्छितात”, असेही अमरिंदर सिंग सिद्धू यांनी म्हटले आहे.

नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी शनिवारी (१४ मे) अमरिंदर सिंग यांच्यावर आरोप केला होता. “अमरिंदर सिंग यांच्यामुळे अमृतसर मतदारसंघातून पंजाबच्या प्रभारी आशा कुमारी यांना उमेदवारी मिळाली नाही. परंतु, अमरिंदर सिंग यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याचप्रमाणे या प्रकरणाशी आपला काहीही संबंध असल्याचे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी राज्यातील सर्वात मोठा घोटाळा केला उघड…

News Desk

“अराजकतेची ठिणगी पडली तर महाराष्ट्रात वनवा पेटेल”, संजय राऊतांची सरकारवर टीका

Aprna

प्लास्टिक बंदी होण्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे !

News Desk
महाराष्ट्र

पुण्यात होर्डिंग कोसळून दोघांचा मृत्यू, नऊ जण जखमी

Gauri Tilekar

पुणे | पुण्यातील जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकातील एक मोठे लोखंडी होर्डिंग आज (शुक्रवारी) दुपारी दीडच्या सुमारास कोसळले आहे. या अपघात दोन जणांचा मृत्यू झाला असून आठ ते नऊ जण जखमी झाले आहेत. त्याचप्रमाणे या अपघातात रस्त्यावरील वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ असलेले हे लोखंडी होर्डिंग तुटून रस्त्यावरील वाहनांवर पडले आहे. त्यामुळे यात सात ते आठ वाहनांचे नुकसान झाले.

पुण्याच्या शाहीर अमर शेख चौकात अनेक मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत. यातीलच एक मोठे होर्डिंग दुपारी कोसळले आहे. या अपघातात दोन जणांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या अपघातातील जखमींना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक अपघातास्थळी पोहोचले असून या घटनेत काही वाहनांचा चुराडा झाल्याची माहिती मिळत आहे. हे होर्डिंग कोसळल्यामुळे शाहीर अमर शेख चौकातील वाहतूक खोळंबली होती.

पुण्यात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरुवात झाली आहे. रेल्वेला महापालिकेने सदर होर्डिंग काढण्यासाठी २०१३ पासून वारंवार पत्र दिले होते. मात्र कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप महानगरपालिकेने केला आहे. हे होर्डिंग कोणत्या कंपनीचे होते यासंदर्भात कोणतीही माहिती अद्याप समजू शकलेली नाही. या अपघातामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे.

Related posts

राज्यात सौर ऊर्जा पार्क उभारणार महानिर्मितीच्या एनटीपीसी समवेत कंपनी स्थापण्यास मान्यता

Aprna

कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे !

News Desk

“कशाला आशीर्वाद?, जनतेचा जीव धोक्यात घालायला” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टीका!

News Desk