नवी दिल्ली | देशभरात आज (१२ मे) लोकसभा निवडणुकांचा सहावा टप्पा पार पडणार आहे. या सहाव्या टप्प्यात ७ राज्यांतील ५९ मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील १४, हरियाणामधील सर्व म्हणजेच १०, बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, दिल्लीतील ७ तर झारखंडमधील ४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सुमारे १० कोटी १८ लाख मतदार यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यासह हरियाणा व दिल्लीतील सर्व मतदारसंघांमधील मतदान प्रक्रिया पूर्ण होईल.
#LokSabhaElections2019 | Voting begins for 59 parliamentary constituencies in the 6th phase of polling across Bihar, Haryana, Madhya Pradesh, Uttar Pradesh, West Bengal, Jharkhand and Delhi. pic.twitter.com/GnAItgVqxz
— ANI (@ANI) May 12, 2019
सहाव्या टप्प्यात ७ राज्यांतील या ५९ मतदारसंघांमध्ये ९७९ उमेदवार आहेत. या टप्प्यात काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया, दिग्विजय सिंह, शीला दीक्षित, भाजपचे नेत्या मनेका गांधी, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, गौतम गंभीर, मनोज तिवारी तर सप अध्यक्ष अखिलेश यादव, आप उमेदवार अतिशी, राघव छड्डा यांसह अन्य अनेक उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत सीलबंद होणार आहे. या टप्प्यात राजधानी दिल्लीसह अन्य महत्त्वाच्या राज्यांचा समावेश असल्याने याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.