नवी दिल्ली | काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी प्रचारासाठी राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्त्यांना संवाद साधताना सीबीआय प्रकरणावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ‘सीबीआयच्या संचालकांनी राफेलवर प्रश्न उपस्थित केले होते. म्हणूनच, काल रात्री देशाच्या चौकीदाराने सीबीआयच्या संचालकांना हटविले,’ अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
Kal raat chowkidar ne CBI ke Director ko hataya kyunki CBI Rafale pe sawal utha rahi thi: Congress President Rahul Gandhi in Rajasthan's Jhalawar pic.twitter.com/nyIFJRiANy
— ANI (@ANI) October 24, 2018
सीबीआयचे संयुक्त संचालक एम. नागेश्वर राव यांची अंतरिम प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. सीबीआयच्या (केंद्रीय अन्वेषण विभाग) सीबीआय संचालक आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील वादाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. याप्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ‘राफेल प्रकरणात मोदी सरकारच्या अडचणी वाढल्यामुळेच सीबीआयचे नाट्य घडवले जात आहे’, असे वक्तव्य केले आहे.
दरम्यान, हे सीबीआयचे प्रकरण सरकारच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील आरोपाची चौकशी सरकार करणार नसून दक्षता आयोगाच्या सल्ल्यानुसार एसआयटी चौकशी करणार आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.