HW News Marathi
राजकारण

सभागृहातील आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर

मुंबई | “काही लोकांना निवडणुकीची भीती वाटत आहे,” असा टोला शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी नाव न घेता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे गटाला लगावला. शिंदेंनी पक्षासोबत बंडखोरी करत भाजपसोबत हात मिळवणी करत राज्यात सरकार स्थापन झाले. पक्षासोबत बंडखोरी केल्याप्रकरणी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्यात शिंदे सरकार पहिले अधिवेशन सध्या सुरु आहे. यावेळी अधिवेशनात विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर 50 खोके, एकदम ओके,  अशा घोषणा देत आहेत. आदित्य ठाकरेंना आज (24 ऑगस्ट) सभागृहात प्रभाग रचनेवर विधेयक मांडण्यात आल्यावर त्यांचे म्हणणे मांडताना शिंदे गटावर टीका केली. आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले.

 

आदित्य ठाकरे म्हणाले, “22 ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु, उद्या निवडणुका असल्याप्रमाणे घाई का केली जात आहे? असा सवाल त्यांनी सभागृहात केली. यानंतर आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “काही लोकांना विवडणुकीची भीती वाटत आहे. कारण सर्व काही घटनाबाह्य करायचे आहे का?, घटनाबाह्य सरकार असेल तर अजून काही बोलणार नाही.” आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, “सभागृहात बरेच सदस्य परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश मिळले असताना ही इतकी घाई का?, असा सवाल करत आहेत. हा आरोप चुकीच्या माहितीच्या आधारे केला जात आहे. वकिलांनी योग्य माहिती न दिल्यामुळे हा संभ्रम झाला. आम्ही कायद्याच्या विरोधात जाऊन कोणताही निर्णय घेणार नाही,” यावेळी मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाचा निर्णय वाचून दाखविला.

 

“दर 10 वर्षांनी लोकसंख्येची मोजणी होते. त्यानुसार प्रभागाचे क्रमांकात वाढ केली जाते. ज्या प्रभागात 20 टक्क्यांच्या लोकसंख्या वाढले, त्या भागाचे सहा प्रभाग वाढतात आणि 3. 8 टक्के लोकसंख्ये असेल तेथे नऊ प्रभाग वाढतात, असे गणित असते. मुंबई पालिकेच्या प्रभाग रचनेविरोधात 892 तक्रारी आल्या आहेत.”

 

 

Related posts

निवडणुकीत बंडखोरी केलेल्या काँग्रेस आमदारांवर कारवाई होणार !

News Desk

शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव! – नाना पटोले

News Desk

“बारामतीला धडक मारुन काय होणार? “, अजित पवारांचा भाजपला सवाल

Aprna