HW News Marathi
राजकारण

समविचारी पक्षांनी भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र यावे | अजित पवार

मुंबई | समविचार पक्षांनी भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आज (१४ फेब्रवारी) मुंबईतील यशवंत सभागृहात झालेल्या बैठकीनंतर अजित पवार प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. पुढे पवार असे देखील म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, स्वाभिमान शेतकरी संघटनाचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करून महाआघाडीत सामील होऊन लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची माहिती पवारांनी दिली आहे.

अजित पवार यांनी बुधवारी (१३ फेब्रुवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान महाआघाडीत सामील होण्याच्या चर्चा झाल्याच्या माहितीवर पवारांच्या बोलण्यानंतर शिक्कामोर्तब झाला आहे. “लोकसभेत भाजप-शिवसेनेचा पराभव करायचा असेल तर धर्मनिरपेक्ष विचारधारा ठेवून एकत्र आले पाहिजे. मनसेनेही मागील वेळी एक लाख मते घेतली होती. त्यामुळे माझे वैयक्तिक मत आहे की, मागच्या गोष्टी मागे सारुन मतविभाजन टाळण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे,” असे अजित पवार यांनी एबीपी माझा या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

 

Related posts

अजित पवार ‘मुतऱ्या’ तोंडाचे सामनातून टीका

News Desk

नरेंद्र मोदी-अमित शहा दोघांची जोडी कृष्णा-अर्जुनासारखी !

News Desk

तासगाव नगरपालिकेसमोर भर पावसात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे उपोषण

News Desk