HW News Marathi
राजकारण

मनसे १०० जागांवर विधानसभा निवडणूक लढविणार ?

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आगामी विधानसभा निवडणूक १०० जागांवर लढविणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मनसे राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक आणि ठाणे या ठिकाणाहून निवडणूक लढविण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी इच्छुक उमेदवारांची यादी मागविली आहे.

राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांची आज (२० सप्टेंबर) बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत मनसे विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे ठरले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मनसेने लोकसभा निवडणूक लढविली नव्हती, मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात प्रचार सभा घेतल्या होत्या. या सभेत राज ठाकरेंनी ग्राफिस आणि व्हिडिओच्या माध्यमातून मोदींचा विरोध केला होता.

गेल्या काही दिवसांपूर्वीच मनसेत विधानसभा निवडणूकही न लढण्याचा सूर पाहायला मिळाल्याची माहिती समोर आली होती. राज ठाकरेंनी ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळे ते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याची शक्यता होती. परंतु त्यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडीत घेतलेले नाही. त्यामुळे आता मनसे स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भंडारा-गोंदियामध्ये भाजपकडून आचारसंहितेचा भंग

News Desk

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादावरुन भाजपावर निशाणा साधला

News Desk

शेतकरी कर्जमाफीचा कार्यक्रम तातडीने जाहीर करा !

News Desk