HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : पार्थ, सुजयच्या पाठोपाठ आता आदित्य ठाकरे देखील निवडणुकीच्या रिंगणात ?

मुंबई | युवासेनेचे अध्यक्ष व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे लोकसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे दोघेही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. आदित्य मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

परंतु या मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन  खासदार आहेत. तर उत्तर पश्चिममध्ये गजानान कीर्तीकर खासदार आहेत. ठाकरे कुटुंबातून आतापर्तंत कोणीही विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढवलेली नाही. आदित्य याधी मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनची निवडणूक जिंकली आहे. सध्या ते युवासेनेचे अध्यक्षपदही सांभाळत आहेत. तसेच ओपन जिम तसेच मुंबईत स्वच्छ शौचालय ही कामे चांगलीच गाजली आहेत.

 

 

Related posts

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदी हे २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार चर्चा

News Desk

मालेगाव बॉम्बस्फोट : पुरोहित यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी

News Desk

#NirbhayaCase : आरोपींची पुनर्विचार याचिका फेटाळली, दोषींना फाशी अटळ

News Desk