HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : सुजय विखे पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार ?

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील आज (१२ मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यात वर्तविल जाते आहे. अहमदनगरमधून सुजयला काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे संकेत मिळाले आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील हे सुजयला नगरमधून उमेदवारी मिळावी. यासाठी दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीला  गेले होते. परंतु नगरची जागा काँग्रेसला मिळत नसल्याने चिरंजीव सुजय राष्ट्रवादीतून लढायला तयार आहेत, असा प्रस्ताव त्यांनी दिला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुजय यांना उमेदवारी देण्यास साफ नकार दिल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद आणि अहमदनगर या दोन जागांवरुन अजूनही आघाडीमध्ये अंतिम निर्णय झालेला नाही.

शनिवारी (९ मार्च) त्यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजनांसोबत सुजय यांनी हेलिकॉप्टरने एकत्र प्रवास केल्यानंतर भाजप प्रवेश करण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. त्यामुळे नगरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला न सोडल्यास सुजय विखे पाटील भाजपची वाट धरतील अशा शक्यता वर्तविल्या जात आहेत.

 

 

Related posts

पोलिसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था न पुरविल्यामुळे हे घडले !

News Desk

संयुक्त पत्रकार परिषदेत मी आणि उध्दव ठाकरे जे बोललो तेच अंतिम !

News Desk

‘तुमचा पीएम आमचा सीएम’ हे मुंगेरीलालच्या हसीन स्वप्नासारखेच | मलिक

News Desk