HW News Marathi
राजकारण

सततच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली; सर्व प्रशासकीय बैठका रद्द

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी आजच्या सर्व प्रशासकीय बैठक रद्द करण्यात आली. सततच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आज (4 ऑगस्ट) प्रकृती बिघडली असून डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना सक्त विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

 

मुख्यमंत्र्यांनी सततचे दौरे, सभा आणि कार्यक्रमामुळे त्यांना थकवा जावू लागला. यानंतर डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांचा चेकअप केल्यानंतर त्यांन सक्त आरामाचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर आजचे सर्व प्रशासकीय बैठक आणि कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा नियोजित कार्यक्रम रद्द करून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत.

 

राज्यातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात पुढील सोमवारी सुनावणी होणार 

 

राज्यातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात काल (3 ऑगस्ट) आणि आज (4 ऑगस्ट) दोन दिवस चर्चा झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयाने 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. यानंतर फडणवीसांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द करत दिल्लीच्या दिशेने रवाना झाले असून फडणवीस दिल्लीला जाऊन राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet meeting) करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील सत्तांतरावर सुनावणी पुढे ढकलली आणि फडणवीसांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

 

 

Related posts

छत्रपतींचा असा अपमान सहन केला जाणार नाही पवारांनी सरकारला खडसावले

News Desk

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेचे नवे गटनेते

Aprna

पालघर निवडणुकांमध्ये युतीला बहुमत, नगराध्यक्ष मात्र राष्ट्रवादीचा

News Desk