HW News Marathi
राजकारण

राज्य सरकारकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी १०० कोटींचा निधी मंजूर

मुंबई | फडणवीस सरकारने शिवसेनेला एक सुखद धक्का दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा मुद्दा जोर धरत आहे. या स्मारकासाठी महापौर निवासाची जागा निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, बाळासाहेबांच्या या स्मारकासाठी एमएमआरडीएकडून १०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने होकार दिला आहे. दरम्यान, हा निर्णय राजकीय गणितांसाठी नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महापौर निवासाची जागा ‘बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्ट’च्या नावावर करण्यात आली आहे. या ठिकाणी सीआरझेडचे नियम, हरित क्षेत्राचे नियम, हेरिटेज इमारतीविषयीचे नियमही मोडीत काढण्याचा प्रयत्न केले जात असल्याचा गंभीर आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय

१. एमएमआरडीएकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करण्यास मंजुरी.

२. दिव्यांग व्यक्तींसाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या इको-फ्रेंडली फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय.

३. मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्रातर्फे महिला सुरक्षितता पुढाकार योजना राबविण्यास मान्यता.

४. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय या स्वायत्त संस्थेचे फर्ग्युसन युनिव्हर्सिटीमध्ये रुपांतर करण्यास मान्यता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पश्चिम बंगालमधील आताची सरकारही एका व्यक्तीसाठी चालवली जाते !

News Desk

“उत्तर प्रदेशात महाराष्ट्र सदन बनवण्यासाठी प्रयत्नशील,” आदित्य ठाकरेंची माहिती

Aprna

मंत्रिमंडळात जाण्याची इच्छा नाही

News Desk