मुंबई | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोश्यारींना कोरोरनाची लागण झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. कोश्यारींना आज (22 जून) उपचारासाठी गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोश्यारींनी काल (21 जून) कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari admitted to HN Reliance Foundation hospital, Mumbai today for #COVID19 treatment: Sources
(File photo) pic.twitter.com/8KE8dplZua
— ANI (@ANI) June 22, 2022
दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेत फुट पडली. यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार बंडाचे हत्यार उपसले. यामुळे शिवसेनेचे बंड केलेल्या आमदार वेगळा गट स्थापन केल्यानंतर राज्यपालांना भेटणार होते. परंतु, यानंतर राज्यपाला सरकारला विश्वास मत सिद्ध करण्याच्या सूचना देणार होते. पण, राज्यपालांना कोरोना झाल्यामुळे महाविकास आघाडीला सरकार वाचवण्यासाठी थोडा वेळ मिळाला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, “माझ्यासोबत ४० आमदार येथे आहेत आणि आणखी १० येणार आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी बंड केलेले नाही. आम्ही कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही. आम्ही सगळे बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही सोडणार नाही. बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांची भूमिका आम्ही पुढे राजकारण आणि समाजकार करणार आहोत.”
संबंधित बातम्या
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.