HW News Marathi
राजकारण

पुण्यात शिवसैनिकांचा रास्ता रोको, इंधन दरवाढीचा निषेध 

पुणे | इंधन दरवाढीविरोधात सर्वसामान्य वाहनचालकांकडून आरडाओरड होत असतानाच सलग 15 व्या दिवशीही पेट्रोल-डिझेल महाग होत असल्याचे चित्र राज्यात पहायला मिळत आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता हैराण आहे. या दरवाढीच्या विरोधात केंद्रातील भाजप सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना पुणे शहर व हडपसर मतदार संघाच्या वतीने महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली घोडयावर फेरी मारून विकास बधे, गणेश कामठे महादेव बाबर या शिवसैनिकांनी हे अनोखे आंदोलन केले . यावेळी कोंढवा भागातील खडी मशीन चौकात सरकारच्या विरोधात घोषणा देऊन रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले.

यावेळी बोलताना शिवसेना नेते गंगाधर बधे म्हणाले , मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी इंधनदराबाबत लवकरच दीर्घकालीन उपाययोजना करणार असल्याचे आश्वासन दिले होते. सरकारी पातळीवर इंधनदर कमी करण्याबाबत घोषणा होत असल्या तरी अंमलबजावणी शून्य असल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे देशात ठिकठिकाणी आंदोलने होत असल्याचेही ते म्हणाले.

या आंदोलनात महिला शिवसेना शहरप्रमुख नगरसेविका संगीता ठोसर,मा. नगरसेवक भरत चौधरी, विजय देशमुख, गंगाधर बधे, विकास बधे, मच्छिंद्र दगडे, अमोल हरपळे, किरण ठोसर, प्रवीण ठोसर, गणेश कामठे , सागर कामठे, समीर तुपे, दीपक घुले, अंबादास शिंगे, भरत शेंडकर, माऊली भोईटे, शंकर लोणकर,सचिन कापरे, राम खोमणे, सुनील कामठे व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…कल्याण मतदारसंघाबाबत

Atul Chavan

#Vidhansabha2019 | वडिलांसाठी ऐरोली मतदारसंघातून संदीप नाईक माघार घेणार ?

News Desk

एमएमआरडीएचा विस्तार होणार, राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk
मुंबई

ठाण्यात तृतीय पंथीला मनसे कार्यकर्त्याकडून बेदम मारहाण

News Desk

ठाणे | ठाण्यातील माजिवडा भागात नाशिक महामार्गाला लागून असलेल्या पाईपलाईन लगत झुडुपात देहविक्रय आणि नागरिकांची लूटमार करणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. एका तरुणीला लुटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्याकडून एका तृतीयपंथीयांना बेदम मारहण करण्यात आली आहे.

माजिवडा भागात राहणारी एक तरुणी शनिवारी रात्री कामावरुन परत येत असताना तीन-चार तृतीयपंथीयांनी तिला लुटण्याचा प्रयत्न केला. याबाबत कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी तिला उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा या तरुणीने आरोप आहे.

याबाबत तरुणीने मनसेकडे तक्रार केल्यानंतर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांसह माजिवडा गाठत या तृतीयपंथीयांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही जण पळून गेले, तर एक तृतीयपंथी मनसे कार्यकर्त्यांच्या हाती लागला. या तृतीयपंथीयाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला. यापुढे जर या भागात तृतीयपंथी आढळले तर त्यांना अशाचप्रकारे चोप देण्यात येईल, असा इशारा यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी दिला.

Related posts

शेंडकरांची प्लास्टिक मुक्तीसाठी अनोखी संकल्पना

News Desk

… आता उद्धव ठाकरेंची संपत्ती जाहीर करणार का? – भाजप

News Desk

बारा तास वीज पुरवठा, शेतक-यांची पुन्हा चेष्ठा

News Desk