HW News Marathi
राजकारण

फलटणमध्ये उदयनराजेंविरोधात घोषणाबाजी अन् कडकडीत बंद

बारामती | बारामतीच्या पाण्यावरून साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि विधानपरिषधेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (१५ जून) घेतलेली बैठक पूर्णपणे निष्फळ ठरली. उदयनराजे आणि रामराजे यांच्यातील वादाने आता अत्यंत हिंसक वळण घेतले आहे. निंबाळकर यांचा पुतळा जाळल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी उदयनराजेंविरोधात घोषणाबाजी करुन फलटण बंदचे आवाहन केले. त्याप्रमाणे, फलटणमध्ये कडकडीत बंद देखील पाळण्यात आला.

रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजे यांच्यावर ‘स्वयंघोषित छत्रपती’ म्हणत टीका केली होती. त्यानंतर उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी पोवई नाक्यावर रामराजे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुतळ्याचे दहन केल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी उदयनराजेंविरोधात घोषणाबाजी करुन फलटण बंदचे आवाहन केले. या बंदला मोठा प्रतिसाद देखील मिळाला. शनिवारी (१५ जून) फलटणमध्ये कडकडीत बंद देखील पाळण्यात आला.

नीरा देवधरच्या पाणी वाटपावरून उदयनराजे भोसले यांनी भाजपचे माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची पाठ थोपटताना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे उदयनराजे यांच्या या वक्तव्याने संतापलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी “उदयनराजेंना आवरा, अन्यथा आम्ही पक्षातून बाहेर पडू”, असा थेट इशारा पवार यांना दिला होता. त्यानंतर आज उदयनराजे, रामराजे आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर उदयनराजे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, शहाणपणा शिकवण्याची गरज नाही !

News Desk

भाजप नाही, काँग्रेसच दलितविरोधी पक्ष !

News Desk

एमपी मिल कंपाऊंड घोटाळा प्रकरण | मनाची लाज ठेऊन मेहतांनी राजीनामा द्यावा !

News Desk