HW Marathi
राजकारण

सुजय विखे पाटील शरद पवारांच्या उपस्थितीत उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश

विशाल पाटील | काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेसची आघाडी झाली असली तरी जागा वाटपावरून अनेकांच्या नाराजीचा व अंतर्गत राजकरणाचा पक्षश्रेष्ठींना सामना करावा लागत आहे. अहमदनगरची जागा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांना अहमदनगरच्या जागेवरुनच लोकसभा निवडणूक लढवायची आहे. या जागेवरून विखे पाटील पिता-पुत्र राजकीय दबाव निर्माण करत आहेत. मात्र सुजय विखे पाटील उद्या (७ मार्च) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, या प्रवेशानंतर सुजय विखे पाटील यांना अहमदनगरची जागा मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून डाॅ. सुजय विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही रंगत होत्या. राष्ट्रवादी काॅंग्रेस अहमदनगरची जागा सोडण्यास तयार नसल्याने या वादावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससमोर नवा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. “अहमदनगरच्या बदल्यात औरंगाबादची जागा घ्या”, अशी ऑफर काँग्रेसने राष्ट्रवादीला दिल्याची माहिती मिळत आहे.

Related posts

पेट्रोल पंपांवर मोदींचा फोटो, दरवाढीचा फलकही लावा! – उद्धव ठाकरे

News Desk

‘लुटो भाई लुटो…. लूट सको जितना लुटो… | धनंजय मुंडे 

अपर्णा गोतपागर

मागच्या दाराने डान्स बार पुन्हा सुरु करणे हा सरकारचा कुटील डाव !

News Desk