नवी दिल्ली | निवडणूक आयोगाने बहुजन समाजवादी पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर घाटलेल्या प्रचार बंदीविरोधात त्यांनीर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने मायावती यांनी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करण्यास साफ नकार दिला आहे. न्यायालयाने नकार देताना म्हटले की, निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकारांचा वापर केला आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवरच आयोग कारवाई करत आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
Supreme Court takes note of action taken by Election Commission against politicians who made statements violating model code of conduct and says, "it seems Election Commission has woken up to its power and taken action against politicians." pic.twitter.com/HcXowvqKeU
— ANI (@ANI) April 16, 2019
निवडणूक आयोगाने घातलेल्या बंदीनंतर मायावती प्रचार सभा आणि रोड शोमध्ये सहभागी होऊ शकत नाही. मायावतीसह निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर ७२ तास अर्थात तीन दिवसाची प्रचार बंदी घातली होती. देवबंद येथे सपा-बसपा आणि रालोदच्या पहिल्याच संयुक्त प्रचारसभेत ‘मी खास मुसलमान सभेदरम्यान मुस्लिम समुदायाला सपा-बसपा महाआघाडीलाच मतदान करण्याचे आवाहन केले होते. धर्माच्या नावावर मते मागतल्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी मायवतींवर कारवाई करण्यात आली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.