HW News Marathi
राजकारण

सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई | लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा होत्या. त्यानंतर पक्षप्रवेशासाठी आजचा मुहूर्त ठरला होता, त्यानुसार पुणेकर यांचा पक्षप्रवेश झाला. “राष्ट्रवादीत प्रवेश करून मला आनंद झाला. माझं स्वप्न होतं राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं ते आज पूर्ण झालंय. दरेकरांनी जे म्हटलं ते ऐकून वाईट वाटलं. त्या वक्तव्याचा मी निषेध करते. त्यांनी तसं बोलायला नको होतं,” असं सुरेखा पुणेकर म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस हा महिलांचा आदर करणारा पक्ष आहे

दरम्यान, पुणेकर यांच्या पक्षप्रवेशापूर्वी भाजपाचे प्रवीण दरेकर यांच्या एका वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, अशी टिपण्णी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली होती. यासंदर्भात एबीपी माझासोबत बोलतांना सुरेखा पुणेकर म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेस हा महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. प्रवीण दरेकर फार चुकीचं बोलले. त्यांना महिलांचा आदर करता येत नसेल तर अवहेलना तरी करु नका. त्यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांना खूप त्रास होईल”

दरेकरांच्या वक्तव्यामुळे लावणी क्षेत्रातील स्त्रियांना खूप वाईट वाटलं

“सगळ्या पक्षांमध्ये लोककलावंत आहेत. माझा पक्षप्रवेश आहे म्हणून दरेकर असे का बोलले. दरेकरांच्या वक्तव्यामुळे लावणी क्षेत्रातील स्त्रियांना खूप वाईट वाटलं. माझ्यासारखी महिला एवढ्या कष्टाने जर घडत असेल. मात्र आज दरेकरांसारखे विरोधी पक्षनेते असे विधान करतात, हे चुकीचे आहे. भाजपा सारख्या पक्षात प्रवीण दरेकर सारखे नेत्यांचा काही उपयोग नाही.”, असे सुरेखा पुणेकर म्हणाल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जागावाटपाला उशीर झाला तरी चालेल, पुण्यातील पूरपरिस्थितीकडे लक्ष द्या !

News Desk

#ElectionsResultsWithHW : देशातील प्रतिष्ठेच्या लढती

News Desk

जातीचे नाव काढेल त्याला ठोकून काढेन, गडकरींचा इशारा 

News Desk