वाराणसी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उभे राहिलेले निलिंबत सैनिक तेज बहादूर यांची उमेदवारीच रद्द करण्यात आली आहे. लष्कराने केलेल्या निलंबनाच्या कारवाईबाबत प्रतिज्ञापत्रांमध्ये योग्य कारण न देऊ शकल्याने निवडणूक आयोगाने तेजबहादूर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. तसेच माझी उमेदवारी रद्द करणे चुकीचे असून मी निवडणूक आयोगाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे तेज बहादूर म्हणाले आहे.तेज बहादूर यांची उमेदवारी रद्द झाल्याने सपा-बसपाला मोठा धक्का बसला आहे.
Samajwadi Party candidate Tej Bahadur Yadav’s nomination for Varanasi rejected, he says, "will go to Supreme Court." pic.twitter.com/t6asrStAyC
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 1, 2019
तेज बहादूर आणि आणि आधीच्या उमेदवार शालिनी यादव यांनी समाजवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, नरेंद्र मोदींसमोर तेज बहादूर हेच उमेदवार असतील. तसेच शालिनी यादव या उमेदवारी अर्ज मागे घेतील, असे समाजवादी पक्षाने स्पष्ट केले होते. या मतदारसंघात काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांनी तेज बहाद्दूर यांचा अर्ज रद्द केला. आता शालिनी यादव सपाकडून मोदींविरोधात उभ्या राहणार आहेत.
Samajwadi Party candidate Tej Bahadur Yadav after his nomination from Varanasi parliamentary seat was rejected: We have been told that we did not produce the evidence that was asked from us before 11 am. Whereas, we had produced the evidence. pic.twitter.com/SOkMRcS2BP
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 1, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.