मुंबई | “कोणता गुन्हा आणि कृत्य केले की त्यांचे मन त्यांना खात होते”, असा उलट सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना केला आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मला तुरुंगात टाकण्याचे षडयंत्र रचल्याचा दाव केला होता. फडणवीसांनी केलेल्या आरोपाचे संजय राऊत यांनी आज (14 फेब्रुवारी) खंडन करत त्यांच्यावर टीका केली. तर शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.
फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचे षडयंत्र झालेले होते, याला उद्धव ठाकरेंची संमती नव्हती तर मुक संमती होती, असा आरोपा केला आहे, असा प्रश्न संजय राऊत यांना पत्रकारांनी केल्यावर ते म्हणाले, “ते खोटे बोलत आहे, परत सांगतो. ते ही राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. ते ही अनेक वर्ष राजकारणात आहेत. विरोधी पक्षनेते पदावर असलेल्या व्यक्तीला एखाद्या आरोपात, राजकीय आरोपात तुरुंगात टाकण्याची परंपरा शिवसेनेची नाही. भाजपची असू शकते. भाजपचे गृहमंत्री असतील माझ्यासारखे पक्षाचे नेते, खासदार, मंत्री आणि संपादक असतील त्यांना तुरुंगात टाकतील. या सुडबुद्धीच्या कारवाया, परंपरा ही विकृती भाजपची आहे. ही आमच्या सरकारची आणि ठाकरे कुटुंबाची अजिबात नव्हती. त्यांनी या भ्रमातून बाहेर पडले पाहिजे. किंवा किंबहुना असे माझे लक्ष्यात आले होते, त्या वेळेला मुळात त्यांना अशी भिती का वाटावी की, मला तुरुंगात टाकतील. असा कोणता गुन्हा आणि कृत्य केले की त्यांचे मन त्यांना खात होते. आमच्या सगळ्यांचे फोन उद्धव ठाकरेंपासून ते शरद पवारांपर्यंत आमच्या सगळ्यांचे फोन टॅपिंग करण्यासाठी रेकॉर्डकरून ते ऐकले जात होते. आणि हा फार मोठा गुन्हा आहे. आमचे फोन ऐकून आमचे सरकार बनत असताना आणि त्या आधी हे आणि ते संबंधित अधिकारी त्यांना जी क्लीनचीटदिली. मग त्यांनी संबंधित अधिकाऱ्यावरती जी कारवाई जो तपास सुरू होता तो का थांबविला. चौकशी झाली असतीना ‘दूध का दूध पानी का पानी’ झाले असते. आल्याबरोबर ज्या चौकश्या थांबविल्या यामध्ये यामध्ये आमचे फोन टॅपिंग जे झाले त्याची चौकशी थांबविली आहे. यांची भीती जी आहे. तुमचे मन तुम्हाला खात आहे.”
पहाटेच्या शपथविधीने फडणवीसांना अजूनही दचकून जाग येते
संजय राऊत म्हणाले, “अजित दादा पवार ठामपणे मजबुतीने महाविकास आघाडीचे नेते म्हणून महाराष्ट्रात वातावरण तयार करत आहेत. आणि भाजपला आव्हान देत आहेत. तेव्हा आमच्या सर्वांच्या प्रतिमांना तडे देण्यासाठी अशा प्रकराचे खोटी विधाने आपण किती ही केली. तरीही लोकांचा विश्वास बसणार नाही. परत सांगतो, पहाटेच्या शपथविधीने फडणवीसांना अजूनही दचकून जाग येते. याची कारणे त्यांनी शोधली पाहिजेत. आणि उपचार करून घेतले पाहिजेत. महाराष्ट्रातील वातावरण हे मंदे आणि फडणवीस सरकार विरोधात आहेत. त्याचा परिणाम असेल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.