HW News Marathi
राजकारण

“राजभवनात घुसून त्यांचा चहा न पिता, बिस्कीटे न खाता त्यांना विचारा की…”, संजय राऊतांचा भाजपला सवाल

मुंबई | “छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान करणाऱ्या राज्यपालांच्या राजभवनात घुसून  त्यांचा चहा न पिता, त्यांची  बिस्कीटे न खाता त्यांना विचारा की, का रे शिवरायांचा अपमान करता?”, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारला केले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या विधान राज्यात त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे.  या पार्श्वभूमीवर आज (5 डिसेंबर) राऊतांनी पुन्हा एकदा राज्यपालांचा टीका केली. यावेळी राऊतांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सीमावाद केलेल्या विधानावरून निशाणा साधला.

राज्यपालांच्या कारवाईसंदर्भात राऊतांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “राज्यपालांवर कारवाई करावी लागेल. ‘आरे’ का रे’ची भाषा जे म्हणतायत ना. आधी राज्यपाला जाऊन  का रे करा. तुमचे जे मुंबई भाजपचे अध्यक्ष काल सांगत होते. आम्ही कर्नाटकच्या आरे ला कारे करू. हा निभळटपणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांच्या राजभवनात घुसून जाऊन त्यांचा चहा न पिता, त्यांची  बिस्कीटे न खाता त्यांना विचारा की, का रे शिवरायांचा अपमान करता?, आधी ‘का रे’ तिथे विचारा. ‘का रे’ तुम्ही छत्रपतींची बदनामी करता?, हे विचारा. मग बाकीचे काय असेल ते. पण, तुमच्या मनगटात तेवढी हिंमत नाही. रोज उटतात आणि शिवरायाची बदनामी करताय. रोज उटतात आणि छत्रपतींचा इतिहास तुडविताय”, असे म्हणत राऊतांनी संतप्त व्यक्त केला आहे.

छत्रपतींचा जन्म महाराष्ट्रात झाला हे तरी मान्य आहे का?, राऊतांचा भाजपला सवाल

“शिवनेवरी जन्म छत्रपतींचा अख्या जगाला माहिती आहे. अख्या जगाला माहिती आहे की छत्रपतींच्या जन्माचे स्थान कोणते. या महाराष्ट्रातील बच्चा बच्चा सांगेन शिवनेरीवर महाराष्ट्राचा राजा जन्माला आला. आणि काल भाजपने शोध लावला शिवसेनेरी नाही. शिवनेरीवर फुली मारली, इतिहासातून शिवनेरी काढून टाकली. छत्रपतींचा जन्म महाराष्ट्रात झाला हे तरी मान्य आहे का आपल्याला?, छत्रपती राजा जन्माला आहे हे तरी आपण स्वाकारताय का?, भाजपला सुद्धा उत्तर द्यावे लागेल”, असा सवाल राऊतांनी भाजपाला केले आहे.

 

 

 

Related posts

भाजपने साध्वी प्रज्ञा यांची पक्षातून हकालपट्टी करून राजधर्म निभवावा !

News Desk

‘भाजपला लोकांनी त्यांची जागा दाखवली’, जयंत पाटलांचं टीकास्त्र

Manasi Devkar

काँग्रेसच लढविणार पुणे मतदार संघ

News Desk