HW News Marathi
राजकारण

“हातातील खंजीर बाजूला ठेऊन बाळासाहेबांना अभिवादन करा”, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांसह शिंदे गटाला टोला

मुंबई | “हातातील खंजीर बाजूला ठेऊन बाळासाहेबांना अभिवादन करा”,असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह शिंदे गटाला दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज (16 नोव्हेंबर) शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाणार आहे. यासंदर्भात पत्रकारांनी राऊतांना प्रश्न विचारल्यावर राऊतांनी शिंदे गट आणि उपमुखय्मंत्र्यांना टीका केली आहे.

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जाणार आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी राऊतांना विचारल्यावर ते म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे हे देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातील खंजीर बाजूला ठेवा. मग स्मारकाला हात जोडाला जा. आपल्या हातातील खंजीर बाजूला ठेवा, मग कोणीही असतील. मी कोणाचे वैक्तिगत नाव घेत नाही. बाळासाहेब एक अशी आत्मा आहे. ते सगळे बघत आहेत. काय सुरू आहे. आणि काय होणार आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेने लोक खंजीर घुपसत आहेत. त्यांचे कधी भले झालेले नाही. हा इतिहास आहे. यासाठी मी ठेवचे सांगेन की, सर्व जण बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊ शकतात. परंतु, चांगल्या मनाने जावा.”

 

Related posts

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी

News Desk

एआयएडीएमकेचे १८ आमदार अपात्रच, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

News Desk

अयोध्येतील श्रीरामाचा वनवास संपायला हवा !

News Desk