HW News Marathi
राजकारण

“…सत्तेशिवाय समोरासमोर या”, संजय राऊतांचे शिंदे गटाला आव्हान

मुंबई | “झुंडशाही आणि मस्तवालपणा हा फक्त सत्ता असल्यामुळे आहे. सत्तेशिवाय समोरासमोर या”, असे आव्हान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाला केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ठाकरे गटाच्या कार्यालयावर बुधवारी (28 डिसेंबर) कोणी नसल्याचे पाहून शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार आणि माजी नगरसेवकांनी दावा केला होता. या प्रकरणाची माहिती मिळातच ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि नेते मुंबई पालिकेत पोहोल्यावर त्यांनी शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते आमने-सामने आल्यावर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप सर्वांच  बाहेर काढले.

 

संजय राऊत म्हणाले, “ते घुसखोर आहेत. त्यांना स्वत:चे काही अस्तित्व आहे का नाही. इकडे घुसा, तिकडे घुसा. हातात सत्ता आहे. ही झुंडशाही आणि हा मस्तवालपणा हा फक्त सत्ता असल्यामुळे आहे. सत्तेशिवाय समोरासमोर या. मग दाखवितो, आणि काल शिवसैनिकांनी दाखविले ना. काल शिवसैनिक गेले आणि त्यांनी खरा शिवसैनिक काय असतो ते दाखविले. गद्दारांची जगभरामध्ये एक पद्धत आहे. गद्दार कुठेही घुसतात. इकडे घुसा, तिकडे घुसा हे सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. महानगर पालिकेमध्ये शिवसेनेचे संपुर्ण बहुमत आहे. शिवसेनेचा पक्ष एकसंघ आहे. आज सगळे नगरसेवक महानगरपालिकेत जातील. आणि मला असे कळाले, महानगर पालिकेतल्या सर्व पक्ष कार्यलयांना सील लावले. कोणत्या कायद्याने नोटीस दिली. ही मनमानी आहे, लोकशाहीचा खून तुम्ही लोकशाहीच्या प्रत्येक लहान मोठ्या मंदिरात करत आहात. या देशामध्ये खरोखर लोकशाही आहे की नाही की, अजून काही चालले आहे. काल प्रकरण हे त्यांचे ज्वलंत उदाहरण आहे. शिवसेनेच्या कार्यालयामध्ये घुसखोरांची टोळी घुसते. ताबा घेतला जातो. आणि त्यानंतर महानगरपालिकेचे प्रशासन हे सर्व पक्ष कार्यालयांना ठाळे ठोकते.”

 

एक बाप असेल तर येतील

शिवसेना भवनावर सुद्धा ताब्यात घेतील, असा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊतांना विचारल्यावर ते म्हणाले, “सोडा, त्यांचे बाप आले पाहिजे, बाप असेल त्यांचा तर ते येतील. एक बाप असेल तर येतील. मी हे ऑन रेकॉर्ड सांगतोय, शिवसेना भवनावर ताबा कोण घेणार, शिवसेना भवन हे शिवसैनिकांचे आहे. बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली वास्तू आहे. आणि ती बाळासाहेबांच्या नावानेच राहिली. आणि ती आमची आहे. हे अशा घोषणा, वलगणा खूप होतात. तुमच्याकडे ऑऊट गेटची सत्ता आहे. ती सांभाळा ऐवढेच मी सांगेन, कृपा करून तुम्ही अशा प्रकारची भाषा वापरला. तर महाराष्ट्रातील वातावरण पुर्णपणे बिघडून जाईल. आणि तुम्ही बिघडवायचे असेल, तर आमची तयारी आहे.

संबंधित बातम्या

ठाकरे गटाच्या BMC कार्यालयावर शिंदे गटाचा दावा; दोन्ही गटाचे नेते आमने-सामने

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंच्या भेटीसाठी नारायण राणे ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी दाखल

Aprna

धार्मिक उन्मादातून मतांच्या धृवीकरणाचा रक्तरंजित ‘पॅटर्न राबविण्याचा प्रयत्न !

News Desk

काँग्रेसचा पराभव झाला म्हणजे संपूर्ण देश हरला हा कोणता तर्क आहे ?

News Desk