मुंबई | “आमचे हिंदुत्व जे आहे, सावरकराप्रमाणे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नसून विज्ञानवादी हिंदुत्व आहे”, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला लगावला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) खासदारकी रद्द झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत “मी सावरकर नाही, गांधी आहे”, असे विधान केले. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्या समर्थनार्थ ‘सावरकर गौरव यात्रा’ काढण्याची घोषणा केली. राज्य सरकारच्या यात्रेवर संजय राऊतांनी आज (28 मार्च) दिल्लीतून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि भाजपवर वीर सावरकर आणि हिंदुत्वाच्या मुद्यांवरून हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले, “आम्हाला या ढोंग्यांनी वीर सावरकर सांगण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही सावरकर जगतोय आणि जगलोय. छत्रपती शिवाजी पार्क ज्याला आपण शिवाजी पार्क म्हणतो. शिवतीर्थ त्यांच्या बाजूला सावरकरांचे जे भव्य स्मारक आहे. ते उभारणीमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान आहे. ते जाऊन पाहा, सावरकरांचे हिंदूत्व आम्ही (शिवसेनेने) स्वीकारले. आमचे हिंदुत्व जे आहे, सावरकराप्रमाणे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नसून विज्ञानवादी हिंदुत्व आहे. हे भाजपला मान्य आहे का?. सावरकरांची गोमातेवरची भूमिका त्यांना मान्य आहे का?, हे ढोंग आहे. हे अदानी बचाव यात्रा आहे. खुर्ची बचाव यात्रा आहे. नाव फक्त सावरकरांचे, यांनी सावरकरांची यात्रा काढणे हे सावरकरांची सर्वात मोठी बदनामी. त्या मुख्यमंत्र्यांना आता फोनवरून उठवा आणि विचारा की, सावरकरांच्या तीन क्रांतीकारी बंधुची नावे माहिती आहेत का? त्यांनी पटकन सांगावे. सावरकरांचा जन्म कुठे झाला हे माहिती आहे का?, त्यांना आता पटकन विचारा. फोन करा आणि विचारा, सावरकरांच्या त्याग मुर्ती पत्नींचे नाव माहिती आहे का?, सावरकरांची जन्मठेप सहा सोनेपाने कधी चाळले का?, हे वाचून दिलेले सावरकरांवरील कागद वाचू नका. आणि सावरकरांचा वारंवार अपमान करून नका. आम्हाला जे काही करायचे आहे ते आम्ही करू.”
सावरकरांविषय दोन वाक्य उस्फूर्तपणे बोलू शकत नाही
भाजपच्या वतीने काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी जाहीर केले की, भाजप गौरव यात्रा काढणार आहे, असा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊतांना विचारल्यावर ते म्हणाले, “हे ढोंग आहे, मुळात सावरकरांचा भाजप आणि संघ परिवाराचा काही संबंध नव्हता. संघ परिवाराला सारवकरांना कायम आपला शत्रू मानला आणि वाळीत टाकला. हे राजकीय ढोक करत आहेत. काल मुख्यमंत्री वीर सावरकर यात्रेसंदर्भात घोषणा करताना. सावरकरांविषय दोन वाक्य उस्फूर्तपणे बोलू शकत नाही. एक कागद होता समोर सावरकरांवरचा तो वाचून दाखवित होते. यांच्या हृदयमध्ये वीर सावरकर आहेत. ते उत्सपूर्तपणे सावरकरांना त्यांनी मानवंदना त्याला पाहिजे होती. पण, ते उपमुख्यमंत्र्यांना विचारतात वाचू का? यालाच गुलामी म्हणतात. आणि याच गुलामी विरुद्ध सावरकरांनी आपले अख्य आयुष्य अंदमानात घालविले. हे राज्याच्या सत्ताधाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. सावरकर गौरव यात्रा हे जरी नाव असले तरी ते आदानी बचाव यात्रा आहे. गौतम आदानी प्रकरणावरचे त्यांच्या लुटमारीवरचे लक्ष महाराष्ट्रात विचलीत व्हावे. म्हणून सावरकरांच्या मुखवट्या खाली हे अदानी गौरव यात्रा काढत आहेत.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.