HW News Marathi
राजकारण

मराठा आरक्षणाचा एटीआर आज विधानसभेत मांडणार

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचा एटीआर (अॅक्शन टेकन रिपोर्ट ) आज (२८ नोव्हेंबर) विधानसभेत मांडणार आहे. मराठा आरक्षणाचा एटीआर विधानसभेत सादर होण्याआधीच विरोधकांच्या गदारोळामुळे १० मिनिटासाठी कामकाज तहकूब केले होते. यानंतर पुन्हा विधानसभेचे कामकाज सुरू झाले.

सभागृहात दगाफटका टाळण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने आपापल्या आमदारांना पुढील तीन दिवसांसाठी व्हीप जारी केला आहे. हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे महत्त्वाचे तीन दिवस शिल्लक आहे. या तीन दिवसात मराठा आरक्षणाचा एटीआर, विधेयक सादर करुन ते मंजूर करुन घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे महत्त्वाचे कामकाज आणि विधेयक पाहता आमदांना सभागृहात हजर राहण्यासाठी व्हीप जारी करण्यात आला आहे.

एटीआर सभागृहात मांडला जाईल त्यानंतर मराठा आरक्षणाचे विधेयक सादर होण्याची शक्यता आहे. काल (२७ नोव्हेंबर) मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. यात एटीआर आणि विधेयक मांडण्याबाबत चर्चा झाली. तसेच १६ टक्के आरक्षण देण्यावर एकमत झाल्याचे कळते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूर परिस्थिती पाहणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडचिरोलीला रवाना

Aprna

भाजपकडून युतीसाठी एक पाऊल पुढे

News Desk

पुण्यात गणपती विसर्जनादरम्यान आदित्य ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्यात गप्पा; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna