HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

भाजपचा जाहीरनामा बंद खोलीत तयार केला !

नवी दिल्ली | भाजपने काल (८ एप्रिल) संकल्प पत्र जाहीर केले. भाजपने संकल्प पत्राऐवजी माफीनामा जाहीर केला असता तर बरे झाले असते, असे ट्वीट करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. भाजजच्या जाहीरनाम्यात  राम मंदिर निर्मितीचा पुनर्निधार, शेतकऱ्यांना ५ वर्षापर्यंत एक लाखाचे बिनव्याजी कर्ज, अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर आणि छोट्या दुकानदारांना निवृत्तीवेतन आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

काँग्रेसचा जाहीरनामा प्रदीर्घ चर्चेनंतर बनिण्यात आल्याचे राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच काँग्रेसचा जाहीरनामा हा लाखो सशक्त आणि बुद्धीमान भारतीयांचा आवाज आहे. परंतु भाजपचा जाहीरनामा हा एका बंद खोलीत तयार करण्यात आलेला आहे. या जाहीरनाम्यात एकट्या पडलेल्या माणसाचा आवाज असून त्याची दूरदृष्टी कमी आणि गर्विष्ट आहे. तसेच पुढे राहुल गांधी असे देखील म्हणाले की,  भाजपने संकल्प पत्रातून निव्वळ खोट्या घोषणा केल्या आहेत.

 

Related posts

‘पवार साहेबांच्या गुप्‍त भेटीवेळी २००० साल का आठवलं नाही’

News Desk

शरद पवार आज राज्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर

News Desk

काकांना उमेदवारी द्या, मग मी भाजप सोडतो !

News Desk