HW News Marathi
राजकारण

भाजपला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला तरीही भाजप दबली जाणार नाही !

अहमदाबाद | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला सुरुवात करून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुकले आहे. शहांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रमही हाती घेतले आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या अहमदाबाद येथील निवासस्थानापासून ‘मेरा परिवार, भाजप परिवार’ या उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमामध्ये जे भाजपचे समर्थकांनी त्यांच्या घरावर भाजपचा झेंडा लावण्यात येणार आहे. आज (१२ फेब्रुवारी) शहांनी आपल्या निवासस्थानावर भाजपचा झेंडा लावला.

“मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदींना सांगू इच्छतो की, भाजपला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला तर भाजप कधी दबली जाणार नाही. उलट भाजपमध्ये दबावामुळे अजून उत्साह निर्माण होतो.” अशा शब्दात शहांनी ममता बॅनर्जीवर निशाणा साधला.

यावेळी झालेल्या कार्यक्रमावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील उपस्थित होते. शहांनी काही दिवसांपूर्वीच या उपक्रमाची घोषणा केली होती. आता भाजप समर्थकांच्या घरावर भाजपचे झेंडे लागण्यास सुरुवात केली आहे. ‘मेरा परिवार, भाजप परिवार’ या उपक्रमाबरोबरच ‘भारत के मन की बात, मोदी के साथ’ याही उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती. यात देशातील जनतेच्या प्रतिक्रिया घेवून भाजप आपला जाहीरनामा तयार करणार आहे. यासाठी भाजप १० कोटी लोकांची मते जाणून घेणार आहे. तसेच देशातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील तीन मार्चला मोटरसायकल रॅल आयोजित करण्यात आली आहे.

उत्तरपूर्व ते कन्याकुमारीपर्यंत तर आसामपासून ते गुजरातपर्यंत मी संपूर्ण देशभरात भ्रमणती केली आहे. देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठिंबशी खंबीरपणे उभी आहे. देशातील मोदी समर्थकांच्या नजरेत दिसते,” असे अमित शाहा यांनी मेरा परिवार, भाजप परिवार’ या उपक्रमा शहा बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण

News Desk

स्मारके कुणाला हवी आहेत? आम्हाला तर शाळा आणि रुग्णालये पाहिजेत !

News Desk

आता यु टर्न म्हणजे उद्धवजी टर्न !

News Desk