मुंबई | राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) आजपासून सुरू होणार आहे. राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांचे आज (27 फेब्रुवारी) विधीमंडळात पहिले अभिभाषण असणार आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मंत्रिमंजळाचा विस्तार होण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु, पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. यामुळे विभागासोबत अतिरिक्त विभागाचे कामकाज अधिवेशनादरम्यान मंत्र्यांना सांभाळावे लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर पत्र शिवसेनेने (शिंदे गट) विधानपरिषद उपसभापतींना दिले आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापान्याच्या कार्यक्रमला विरोधकांनी बहिष्कार टाकला. यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशन गाजण्याचे स्पष्ट संकेंत मिळाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन असून या अधिवेशनात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. या प्रकरणाचे अधिवेशनात पडसाद पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशात शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी, कापसाचे दर, कांद्याचे दर आणि आदी मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तर लोकायुक्त विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभा प्रस्तावित विधेयके व अध्यादेश
विधान परिषदेत प्रलंबित विधेयक-3
प्रस्तावित विधेयके-7
प्रस्तावित विधेयके-मंत्रिमंडळाची मान्यता अपेक्षित-6
विधान परिषदेत प्रलंबित विधेयके
(1) विधानसभा विधेयक – महाराष्ट्र कामगार कायदे (सुधारणा) विधेयक, 2022 (शिक्षेच्या तरतूदीमध्ये बदल करणेबाबत) (उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग)
(2) विधानसभा विधेयक – स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
(3) विधानसभा विधेयक – महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक, 2022 (सामान्य प्रशासन विभाग)
विधानसभा प्रस्तावित विधेयके
(1) विधानसभा विधेयक – महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना (सुधारणा) विधेयक, 2023 (विविध कलमांमध्ये सुधारणा करण्याबाबत) (नगर विकास विभाग).
(2) विधानसभा विधेयक – महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) विधेयक, 2023. (गृह विभाग)(विशेष पोलीस आयुक्त या पदाच्यासंदर्भाचा समावेश करण्यासाठी वैधानिक तरतुद करणे)
(3) विधानसभा विधेयक – महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गूंतवणूक सुविधा विधेयक, 2023. (उद्योग, ऊर्जा व कामगार) (महाराष्ट्र राज्यात औद्योगिकीकरणाला चालना देण्याची गरज लक्षात घेता, राज्यात अधिकाधिक गुंतवणुक आकर्षित करणेसाठी तसेच राज्यामध्ये व्यवसाय सुलभीकरण करण्यासाठी उद्योजकांना आवश्यक असलेले परवाने, संमती विहीत वेळेत मिळवण्यासाठी तसेच त्याद्वारे उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी एक खिडकी योजनेला वैद्यानिक दर्जा मिळवण्याची तरतुद करण्याकरिता विधेयक)
(4) विधानसभा विधेयक – महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, 2023 (ग्राम विकास विभाग) (शिक्षेच्या तरतूदीमध्ये बदलकरणेबाबत)
(5) विधानसभा विधेयक – मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2023 (नामनिर्देशित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याबाबत) (नगर विकास विभाग).
(6) विधानसभा विधेयक – महाराष्ट्र वैद्यकीय प्रापण प्राधीकरण विधेयक, 2023. (वैद्यकीय शिक्षण विभाग)
(7) विधानसभा विधेयक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2023 (विद्यापीठांचे कुलगुरू नियुक्ती करण्याच्या व प्र. कुलगुरूची नियुक्ती करण्याच्या पात्रता निकषांची व निवड समिती गठित करण्याची तरतूदी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी अनुरूप करण्याकरिता सुधारणा करणे) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग.
प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता अपेक्षित) -6
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.