HW News Marathi
राजकारण

1767 कोटींची जमीन मुख्यमंत्र्यांनी 3 कोटीत विकली | काँग्रेस

मुंबई | नवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जागेबाबत मोठा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. हा घोटाळा तब्बल एक हजार 767 कोटी रुपयांचा असल्याचा दावा काँग्रेसने पत्रकार परिषदेत सोमवारी केला.

सिडकोच्या ताब्यातील जागेची किंमत तब्बल एक हजार 767 कोटी रुपये असताना ती फक्त तीन कोटी रुपयांत बिल्डर मनिष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकण्यात आली, असा आरोप काँग्रेसने केला आहे. मुंबईत काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केले. यावेळी संजय निरुपम, पृथ्वीराज चव्हाण, रणदीप सुरजेवाला, प्रियंका चतुर्वेदी हे कॉंग्रेसचे नेते उपस्थित होते.

कॉंग्रेसकडून फडणवीसांच्या न्यायालयीन चौकशीची मागणी

सिडकोच्या ताब्यात असलेला हा भूखंड किमान 1 हजार 600 कोटी रुपयांचा आहे. या घोटाळ्यात आजपर्यंत अनेकांना क्लीन चिट देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामील आहेत. त्यामुळे या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी, पॅराडाईजचे प्रमुख या सर्वांची चौकशी मुंबई उच्च न्यायलयांच्या न्यायाधीशांकडून केली जावी, अशीही मागणीही यावेळी कॉंग्रेसकडून करण्यात आली. तसेच सरकारकडून ही मागणी अमान्य केल्यास मुंबई काँग्रेस उच्च न्यायालयात धाव घेईल, असा इशारा संजय निरुपम यांनी दिला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘तुमचा पीएम आमचा सीएम’ हे मुंगेरीलालच्या हसीन स्वप्नासारखेच | मलिक

News Desk

भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Gauri Tilekar

इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या विजयाचा मार्ग झाला सोपा ?

News Desk