मंदसौर | मध्य प्रदेशमध्ये ज्या दिवशी काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, त्या दिवसापासून अवघ्या दहा दिवसांच्या आत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असे वचन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदसौर येथील सभेत शेतक-यांना संबोधित करताना दिले आहे. मध्य प्रदेशच्या मंदसौर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराच्या पहिल्या स्मृतिदिनी राहुल गांधी उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच शेतकऱ्यांना न्याय आणि कर्जमाफीसारख्या विषयांवर भाष्य केले.
My dream is that when we come here after 5-7 years & look at our phones, we find "Made in Mandsaur" written on it. Narendra Modi & Shivraj Singh won't be able to do this work. Kamal Nath & Scindia (Jyotiraditya Scindia) can do this: Congress President Rahul Gandhi in #Mandsaur pic.twitter.com/OmhCf3TVzv
— ANI (@ANI) June 6, 2018
मोठ्या उद्योगपतींचे लाखो करोड रुपयांचे कर्ज माफ होते. मात्र शेतकऱ्यांना एका रुपयाचीही कर्ज माफी मिळत नाही, अशी टीका करत यावेळी राहुल गांधींनी ज्या दिवशी राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, त्या दिवसापासून दहा दिवसांच्या आत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, असे वचन दिले. यावेळी सभेला संबोधित करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी मंदसौर येथे झालेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच त्यांना आपले सरकार आल्यानंतर दहा दिवसांच्या आत न्याय मिळेल, असे वचन देखील दिले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.