HW News Marathi
राजकारण

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाले…

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्रीआणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ट्वीट करत उद्धव ठाकरेंना वाढदिवसांच्या शुभेच्या दिल्या आहेत. शिंदेंनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यामुळे राजकीय वर्तुळा चर्चेला उधाण आले आहे. तर दुसऱ्या बाजूला मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांची रिघ लागली आहे.

शिंदेंनी ट्वीटमध्ये म्हणाले, “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना….”,  या ट्वीटमध्ये शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा न करता माजी मुख्यमंत्री म्हणून केला आहे.

दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे.या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी शिंदेवर सडकून टीका केली आहे.  “ही सडलेली पाने असतात, ती झडलीच पाहिजे. ती झडताय पाने ती झडलीच पाहिजे. आता सडलेली पाने झडताय,” असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदेना लगावला आहे.

 

संबंधित बातम्या

“सडलेली पाने असतात, ती झडलीच पाहिजे,” उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपण एकत्र राहिलो तर भाजपचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही !

News Desk

अशोक चव्हाण यांना भाजपच्या ‘या’ नेत्यांनी दिली ऑफर

Aprna

मनेका गांधी आणि आझम खान यांच्यावर देखील प्रचार बंदी

News Desk