HW News Marathi
राजकारण

महामंडळाच्या नियुक्त्या जाहीर

मुंबई | अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरु आहे व पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे बोलले जात आहे. काही महामंडळाच्या घोषणा झाल्या आहेत तर उर्वरित महामंडळाच्या घोषणा लवकरच होतील. भाजप कोअर कमिटी आणि मित्रपक्षांशी चर्चा करूनच विस्तार करण्यात येईल, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

परदेशातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुणाला मंत्री करायचे याबाबत विचार करुनच आले आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार निश्चितपणे होईल, असे म्हणत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे कुणाला नवी जबाबदारी मिळणार आणि कुणाला डच्चू दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महामंडळ पदाच्या नियुक्त्या जाहीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी दोन मंडळाचे अध्यक्ष आणि दोन महामंडळाच्या उपाध्यक्षपदांच्या नियुक्तीला मान्यता दिली होती. त्यावर राज्य शासनाने आमदार चैनसुख संचेती यांची विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी तर डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांची ऊर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे अशि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबत माहिती दिली.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी आमदार डॉ. सुनील पंजाबराव देशमुख यांची, तर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी खासदार संजय काका पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असलेल्या डॉ. सुनील पंजाबराव देशमुख यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंबेडकरांचा गेम प्लॅन नेमका काय हे आम्हाला कळत नाही ! 

News Desk

योगी आदित्यनाथ यांची ओवेसींना धमकी ?

News Desk

येडं पेरलं अन् खुळं उगवलं, धनंजय मुंडेंची दानवेंवर जहरी टीका

News Desk