HW News Marathi
राजकारण

सध्याच्या शिवसेनेचे धंदेवाईक राजकारण सुरु !

वैभववाडी“सध्याच्या शिवसेनेने धंदेवाईक राजकारण सुरु केले, असून जिल्हाचा पालकमंत्री आणि खासदार कुचकामी आहे. साडेचार वर्षांत जिल्हयासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत व राज्य सरकारने काय केले”? याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. “मराठी माणसांसाठी शिवसेना होती असे भासविण्यात आले होते. मग महाराष्ट्रातील मराठी युवक युवतींसाठी त्यांनी काय केले”? असा सवाल स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शिवसेनेवर उपस्थित केला आहे.

“सत्तेशिवाय मातोश्रीची चुल पेटणार नाही. त्यामुळे सत्तेला लाथ मारण्याची भाषा करीत असले तरी ते कधीही सत्ता सोडणार नाहीत,कारण सत्ता हाच शिवसेनेचा प्राणवायू आहे”, अशी टीका राणेंनी शिवसेनेवर केली आहे. वैभववाडीमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची जाहीर सभा झाली त्यामध्ये राणे बोलत होते.

“मी आणलेल्या प्रकल्पांचीच भूमीपूजन आणि वारेमाप घोषणा करण्यापलीकडे रोजगार आणि विकासाचा कोणताही प्रकल्प पालकमंत्री, खासदार आणि कुडाळच्या आमदाराने आणलेला नाही”, अशीही टीका राणेंनी केली आहे. जनतेच्या हिताचा विचार करुन स्वाभिमान पक्ष काढण्याचा निर्णय आपण घेतला. त्यामुळे जात-धर्म विसरुन ‘कोकणी माणूस’ म्हणून स्वाभिमान पक्षाच्या पाठीशी राहा,असे आवाहन राणेंनी जनतेला केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझा भीमा-कोरेगाव, एल्गार परिषदेशी काहीही संबंध नव्हता | तेलतुंबडे

News Desk

दसरा मेळावा निमित्ताने ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना रंगणार; कोण बाजी मारणार, सर्वांचे लक्ष

Aprna

ती भेट अखेर राहूनच गेली! विक्रम गोखलेंना पंकजा मुंडेंनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली

Manasi Devkar