अयोध्या | भाजपाचे सरकार प्रभू रामचंद्रांची फसवणूक केली आहे असे विधान राम जन्मभूमी मंदिराचे प्रमुख संत आचार्य एस. दास यांनी केले आहे. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. भाजप प्रभू रामाचे नाव घेत सत्तेत आले मात्र त्यानंतर त्यांना प्रभू रामाचा पूर्णपणे विसर पडला असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.
Ram ke saath ek prakar se Party(BJP) ne dhokadadi kiya,Ram ke naam se Party satta mein aayi aur phir Ram ko bhool gayi. If the Party wants to win in 2019,it should start construction of Ram temple else it’ll be difficult for them:Acharya S Das,Chief priest, Ram Janmabhoomi temple pic.twitter.com/FmMAS9Q3aC
— ANI UP (@ANINewsUP) June 5, 2018
‘भाजपाला २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकायची असल्यास, त्यांनी आता राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात करावी. अन्यथा आगामी निवडणूक जिंकणे भाजपाला जड जाईल,’ असे आचार्य दास म्हणालेत. काही तासांपूर्वीच चवानी मंदिराचे महंत परमहंस दास यांनी राम मंदिराचे बांधकाम तातडीने सुरू न केल्यास भाजपाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. यानंतर आता राम जन्मभूमी मंदिराचे प्रमुख संत आचार्य दासदेखील या मुद्यावरुन आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.