HW News Marathi
राजकारण

गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांची हजेरी; तर मुंडे बहिणींची दांडी

मुंबई | बीड जिल्ह्यात गहीनाथ गडावरील संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीचे आज आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बीडमध्ये उपस्थित होते. परंतु, या कार्यक्रमासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) या दोन्ही बहिणींनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळता चर्चेला उधणा आले आहे.

या कार्यक्रमासाठी दरवर्षी पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे उपस्थित असताना. यंदा धनंजय मुंडे यांचा अपघात झाल्यामुळे ते कार्यक्रमासाठी उपस्थित नाहीत. परंतु, या कार्यक्रमाला दोन्ही मुंडे बहिणींनी गैरहजेरीमुळे वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहे. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस हे असल्यामुळे या दोन्ही बहिणींनी पाठ फिरविल्याचे आहेत. देवेंद्र फडणवीसांविरोधात दोन्ही मुंडे बहिणींनी उघडपणे नाराजी दाखविली आहे.

औरंगबादमधील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांच्या सभेला पंकजा मुंडे यांना आमंत्रण देण्यात आले नव्हते. तरी सुद्धा पंकजा मुंडे या औरंगबादच्या सभेत उपस्थित राहिल्या होत्या, यामुळे तेव्हा देखील पंकजा मुंडे नाराज असल्याचे चर्चा रंगल्या होत्या. यानंतर आज बीडमधील कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी गैरहजर राहिल्या आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तब्बल ४ वर्षांनंतरही परळी-धायगुडा राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था कायम

News Desk

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजपाच्या मुसक्या आवळल्या

News Desk

#RamMandir : निवडणुकीच्या काळातच राम राम करतात, नंतर आराम करतात !

News Desk