HW News Marathi
राजकारण

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (३० मे) शपथविधी सोहळा पार पडला. मोदींसह ५७ सहकाऱ्यांना मंत्री व राज्यमंत्रीपदाची शपथ दिली. या शपथविधीनंतर आज (३१ मे) संध्याकाळी नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार असून यावेळी खाते वाटपांवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून या बैठकीला सर्व नवनिर्वाचित मंत्री उपस्थित राहतील. या बैठकीत खाते वाटपाव्यतिरिक्त आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असून, माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचाही समावेश केला आहे. राजनाथ सिंह, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, स्मृती इराणी या जुन्या मंत्र्यांसह नव्या चेहऱ्यांनाही मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. शिवसेनेतर्फे अरविंद सावंत यांचा कॅबिनेट मंत्रीपदी समावेश करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“झोपलेलं सरकार जागं होऊ दे…”; ‘मविआ’चे आमदार सरकारविरोधात आक्रमक

Aprna

एक्झिट पोलचा परिणाम, शेअर बाजारात तेजी

News Desk

मसूद प्रकरणी मोदींनी पाकिस्तानचे दात घशात घातले, कमाल झाली !

News Desk