June 26, 2019
HW Marathi
राजकारण

विधासभा निवडणुकीच्या निमित्ताने जनतेला काँग्रेसच्या युवा चेहऱ्यांची ओळख

मुंबई | देशात नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तीन राज्यात दणदणीत विजय मिळाला. गेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजपाने मध्य प्रदेशमध्ये आपली पकड कायम ठेवली होती. त्या विजयावर कॉंग्रेसने या निवडणुकीत आपले नाव कोरुन इतिहास रचला. या निवडणुकीच्या निमित्ताने युवा चेहरा काँग्रेसची नवीन ओळख बनला आहे. निकालानंतर  ज्योतिरादित्य सिंधिया मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा युवा चेहरा म्हणून ओळखू जावू लागले आहेत. तर  राजस्थानमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळण्यास दिली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये  नव्या चेहऱ्यांनी काँग्रेसमध्ये नव संजीवनी दिली आहे. या दोघांनी त्यांच्या राज्यातील जनतेची पुन्हा एकदा काँग्रेसशी नाळ जोडली आहे.

या दोघांचा मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता स्थापना करण्यात सिंहाचा वाटा आहे. या निवडणुकीनंतर ज्योतिरादित्या सिंधिया आणि सचिन पायलट मुख्यमंत्री पदाच्या शर्यती आघाडीवर होते. परंतु  पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसार मध्य प्रदेश कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांची मुख्यमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशमध्ये गेल्या १५ वर्षांपासून भाजपची सत्ता होती. परंतु भाजपच्या सत्तेला ज्योतिरादित्य यांनी सुरूंग लावून काँग्रेसची विजयी पताका फडकवली.  मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदी ज्योतिरादित्य सिंधिया यांची  नियुक्ती होण्यापुर्वीच समर्थकांनी पोस्टर लावून शुभेच्छा दिल्या. दुसऱ्याबाजूला राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या काँग्रेस सोडून जाण्याचा इशारा दिला. तर काहींनी रास्ता रोको केला होता. या दोघांची मुख्यमंत्री पदी नियुक्ती झाली नसली तरी या निवडणुकीमध्ये जनसामान्याची मने जिंकण्यात त्यांनी यश मिळविले आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकीमध्ये सचिन पायलट यांच्या कष्टाची नोंद घेत त्यांची राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी निवड करण्यात आली आहे. तर ज्योतिरादित्य सिंधिया मध्य प्रदेशमधील गुना येथून लोकसभा सदस्य आहेत. परंतु सिंधिया यांना आगामी लोकसभा निवडणुकीत नवीन जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

 

 

Related posts

आमच्याकडे सर्वच जण पंतप्रधान असतील !

News Desk

#LokSabhaElections2019 : पाटीदार सामाजाचे नेते हार्दिक पटेल आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

News Desk

लोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करतात !

News Desk