HW News Marathi
राजकारण

मध्य प्रदेशात ४ भाजप नेत्यांची हत्या, सरकारविरोधात आंदोलन

भोपाळ | मध्य प्रदेशात गेल्या १० दिवसात ४ भाजपा नेत्यांच्या हत्येच्या घटना घडल्या आहेत. या विरोधात आज (२१ जानेवारी) मध्य प्रदेशात भाजप कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले आहे. रविवारी (२० जानेवारी) बडवानीत भाजपचे मंडलचे अध्यक्ष मनोज ठाकरे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या राजकीय हेतूने झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. या हत्येने संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली होती. त्याचे पडसाद दिल्लीतही उमटले.

बडवानीमध्ये रविवारी भाजपचे मंडल अध्यक्ष मनोज ठाकरे हे सकाळी फिरण्यासाठी निघाले होते. तेव्हा मनोज यांची दगडांनी ठेचून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मृतदेहाजवळ रक्तानं माखलेला दगड आढळून आला. संपूर्ण प्रकरणाचा तपास मध्य प्रदेश पोलीस करत आहेत. परंतु मनोज यांच्या हत्येचा गुन्हेगार हाती लागलेला नाही. तर रविवारीच गुनामध्ये परमाल कुशवाह या नावाच्या तरुणाची गोळी झाडून हत्या झाली.भाजपचे संयोजक शिवराम कुशवाह यांचा नातेवाईक होता.तो परमालच्या हत्येमागे काँग्रेसचा हात असल्याची आरोप भाजपकडून केला जात आहे.

गुरुवारी (१७ जानेवारी) संध्याकाळी प्रल्हाद बंधवार यांची भरबाजारात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बंधवार यांनी दोनवेळा मंदसौर नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. बंधवार यांच्यावर बुलेटवर स्वार होऊन आलेल्या एका व्यक्तीने त्यांना गोळी घातली. तसेच बुधवारी (१६ जानेवारी) संध्याकाळी इंदूरमधील व्यावसायिक आणि भाजप नेते संदीप अग्रवाल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या भागापासून पोलीस स्टेशन अवघे १०० मीटर दूर आहे. यानंतर अग्रवाल यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. उत्तर प्रदेश पोलिसांनी या चारही हत्येची आरोपींना अद्याप पकडले नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यात भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एक ‘पगडी’ राजकारण महाराष्ट्रासाठी घातक सामनातून पवारांवर टीका

News Desk

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना जामीन मंजूर

Aprna

आज पंतप्रधान मोदींची मुंबईत तर शरद पवारांची ठाण्यात प्रचार सभा

News Desk