HW News Marathi
राजकारण

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

मुंबई। चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचारात आरोप प्रत्यारोपणाच्या फौरी झाडल्या गेल्यानंतर काल (१९ऑक्टोबर) प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आता २१ आॅक्टोबरच्या मतदानाची व २४ तारखेच्या निकालाची उत्सुकता आहे. अनेक ठिकाणी कालपासून पावसाने प्रचारात व्यत्यय आणला, पण उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. विदर्भाचा काही भाग वगळता राज्यभर पाऊस होता. त्या पावसातच नेते व उमेदवारांच्या सभा रोड शो व पदयात्राही सुरू होत्या. उघड प्रचार संपला आहे, तरी उमेदवार रविवारी मतदारांच्या भेटीगाठी घेतील आणि कार्यकर्तेही सोमवारी (२१ऑक्टोबर) मतदान अधिकाधिक व्हावे, यासाठी प्रयत्न करतील. रविवार व सोमवारीही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघामध्ये सोमवारी मतदान होत आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शनिवारी सायंकाळी प्रचार बंद करण्यात आला. शिवसेना-भाजपने आधीचा पालिका, विधानसभा, लोकसभेचा प्रचार डोळ्यांसमोर ठेवून प्रचाराचे नियोजन केल्याचे जाणवले. तसेच मनसेने अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेद्वारे एक उत्तम विरोधी पक्षाची भूमिका घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यभरात प्रचारचा धुरळा उडविला. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी येणार नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यानंतर मात्र, राहुल गांधीनी मुंबई दौऱ्यावर आले. यानंतर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी प्रचार सभा घेतल्या.

तसेच शिवसेना-भाजप महायुतीच्या प्रचारसाठी थेट दिल्लीतील नेतेमंडळीत महाराष्ट्रात प्रचार सभा घेत होते. यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील राज्यभरातील ठिकठिकाणी प्रचार सभा घेतल्या. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात ४८ प्रचार सभा घेतल्या. आता सर्वांना उत्सुकता लागली ती २४ तारखेच्या निकालाची, महायुती, महाआघाडी आणि वंचित बहुजन आघाडी नक्की जनता कोणाला कौलु देईल याकडे सर्वांचे लभ लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गेल्या साडेचार वर्षात मोदी सरकारने मुस्लिम विरोधीच काम केले | ओवेसी

News Desk

काँग्रेसचे संकटमोचक डी. के. शिवकुमार यांना ‘ईडी’कडून समन्स

News Desk

शाह फैसलला पोलिसांनी ठेवले नजरकैदेत

News Desk