HW News Marathi
राजकारण

उद्या आम्ही अधिकृत कॅबिनेट करून नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणार! – मुख्यमंत्री

मुंबई | “महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि आणखी काही निर्णय घेतले. ही कॅबिनेट बैठक बेकायदेशीर होती. आणि म्हणून उद्या सकाळी आम्ही अधिकृत कॅबिनेट करून नामांतराच्या  निर्णयावर शिक्कामोर्तब करणार आहोत,” अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांचा आज (15 जुलै) मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिरात आमदार अब्दुल सत्तार यांचा सत्कार करण्याच्या वेळी बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ” संभाजीनगरचे नाव आता जेव्हा आम्ही हिंदुत्वाची भूमिका घेतली. त्यावेळी संभाजीनगर हे नाव शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतले. शेवटची कॅबिनेट बैठक ही अनधिकृत आहे. आज मी तुम्हाला सांगतो, जेव्हा सरकार अल्पमतात असते. आम्ही तेव्हा राज्यपालांना मत्र दिले होते की, आमच्याकडे एवढे संख्याबळ आहे. आम्ही न्यायालयात देखील भूमिका मांडली होती. असे असताना कोणतीही कॅबिनेट घेता येत नाही. परंतु, शेवटची कॅबिनेट घेतली 200 जीआर काढले. कॅबिनेटमध्ये निर्णय घेतले. संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि आणखी काही निर्णय घेतले. ही कॅबिनेट बैठक बेकायदेशीर होती. आणि म्हणून उद्या सकाळी आम्ही अधिकृत कॅबिनेट करून नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणार आहोत. कारण उद्या कोणी चॅलेंज करेल, तुमच्याकडे अधिकारच नाही. कॅबिनेट घेण्याचा आणि त्या कॅबिनेटमध्ये तुम्ही हे निर्णय घेतले ते बेकायदेशीर होते. आम्ही कोणत्या निर्णयाला स्थगिती दिली संभाजीनगर हे बाळासाहेबांच्या मुखातून निघालेले संभाजीनगर आहे. तुम्ही कितीही काही खोटे सांगण्याचा प्रयत्न केलात तरी जनता त्यावर विश्वास ठेवणार नाही. आज आमचे हिंदुत्व आहे, पण आमचे हिंदुत्व आज सत्तार भाई आमच्यासोबत आहेत.”

 ‘अन्यायाविरोधात पेटून उठा,’ बाळासाहेबांची शिकवण

“आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. छातीचा कोट करून लढणारे आम्ही शिवसैनिक आहोत. त्यामुळे तुमच्या कोणत्याही कारवाईला घाबरायची आम्हाला घाबरायची गरज नाही. तुम्ही आम्ह परिक्षण करायचे सोडून आम्हाला काय काय उपमा दिल्या. बंडखोरी, गद्दार कोणाला काय कोणाला वाटेल ते तोंडामध्ये बोलायला लागले. बाळासाहेबांनी देखील आम्हाला सांगितले होते की, त्यांची शिकवण होती, अन्यायाविरोधात पेढून उठा. अन्याय सहन करू नका. अडीच वर्ष सहन केला, काय मिळाले आमच्या शिवसैनिकांना बाळासाहेब नेहमी सांगायचे. काँग्रेस-राष्ट्रवादी हे आमचे शत्रू आहेत. यांना जवळ करू नका, अशी वेळ येईल, तेव्हा माझी शिवसेना काँग्रेस करायची वेळ येईल. त्यावेळीस मी शिवसेनेचे दुकान बंद करेन, हे बाळासाहेबांचे शब्द आहेत. आज सावरकरांबद्दल आम्हाला व्यक्त होता येत नाही,” असे मुख्यमंत्री सत्कार सोहळ्यात म्हणाले.

संबंधित बातम्या

ठाकरे सरकारच्या नामांतराला शिंदे सरकारनी दिली स्थगिती

“औरंगजेब तुमचा कोण लागतो, की तुम्ही ‘त्या’ निर्णयाला स्थगिती देताय?,” राऊतांचा शिंदे सरकारला सवाल

 

 

Related posts

राम कदम दोषी आढळल्यास कारवाई करू | विनोद तावडे

News Desk

कसब्यातील विजयानंतर रवींद्र धंगेकरांनी घेतली शरद पवारांची भेट

Aprna

आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन

News Desk