HW News Marathi
राजकारण

“…अफवांवर विश्वास ठेवू नये,” शिंदेंनी पवार भेटीचे वृत्त फेटाळले

मुंबई | राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत असलेल्या एक फोटोसध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये शिंदेंनी पवारांना पुष्पगुच्छ देतानाचा फोटो चांगला व्हायरल होत आहे. शिंदेंनी ट्वीट करत स्पष्टीकरण देत म्हणाले, “कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.” परंतु, शिंदे-पवारांच्या फोटोने चर्चेला उधाण आले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज (6 जुलै) स्पष्टीकरण दिले की, या बातमी चुकीची आहे तर यात कुठलेही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदे ट्वीटमध्ये म्हणाले, ” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.शरद पवार साहेब यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये…..” राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवत आहे, असा आरोप शिंदेंनी केला होता.

विधानसभेत 4 जुलै रोजी बहुमत चाचणीमध्ये 164 मतांनी विजयी मिळाले. तर महाविकास आघाडीमध्ये 99 मतांनी पराभव झाला. तसेच  शिंदेंनी पक्षासोबत बंड पुकारले 40 आमदार आपल्या बाजूला वळवले असून अपक्ष 10 असे 50 आमदार आपल्यासोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यापुढेही मी जनतेसाठी कार्यरत राहणार !

News Desk

#LokSabhaElections2019 : शिवसेनेपुढे जालन्यानंतर आता उस्मानाबादचा तिढा

News Desk

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे चिन्हासाठी दिले ‘हे’ तीन नवे पर्याय

Aprna