नवी दिल्ली | आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जाच्या मागणीसाठी तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आज (११ फेब्रुवारी) एकदिवसीय उपोषणास बसले आहेत. चंद्राबाबू यांनी नवी दिल्लीत केंद्र सरकारविरोधात उपोषणाला बसलेले आहेत. चंद्राबाबू यांनी पोस्टरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “ज्याच्या हाती चहाचा रिकामा कप द्यायला हवा होता, त्यांच्या हाती जनतेच्या जनतेने सत्ता दिली.”
Delhi: TDP MP Jayadev Galla, on posters which were earlier seen at the venue of the ongoing protest at Andhra Pradesh Bhawan: We don't endorse it. It is not correct and it should not be done. It must not have been put by our party people. pic.twitter.com/UMaQrpNCYR
— ANI (@ANI) February 11, 2019
“‘ज्याच्या हाती चहाचा रिकामा कप द्यायला हवा होता, त्यांच्या हाती जनतेच्या जनतेने सत्ता दिली’ असे वाक्य चंद्राबाबू यांच्या उपोषणस्थळा जवळ असलेल्या नंदीच्या मूर्तीजवळ सफेद रंगाच्या कागदावर हिंदीत लिहून ठेवण्यात आले आहे. तेलगू देसम पक्षाकडून सुरू असलेल्या आंदोलनात काळ्या फलकावर पांढरी अक्षेर आणि पिवळ्या रंगाचा वापर सगळीकडे दिसतो आहे. तसेच इंग्रजी आणि तेलगू भाषेतच आंदोलकांचे फलक आहेत. ” पंतप्रधानांबद्दल असे लिहिणे हे योग्य नाही. हे आम्ही लिहिलेले नाही. असे कृत्य कुणीही करू नये, असे स्पष्ट मत टीडीपीचे खासदार जयदेव गाला यांनी व्यक्त केले आहे.
‘जिसके हाथ में चाय का झूठा कप देना था, उसके हाथ में जनता ने देश दे दिया’।
Placard at AP Bhavan where Chandrababu Naidu is apparently sitting on protest…
Opposition never misses an opportunity to target PM’s humble social origins. क्या पिछड़ी जाती का और ग़रीब होना अभिशाप है? pic.twitter.com/b3HhEdLcF4
— Amit Malviya (@amitmalviya) February 11, 2019
या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना चाय वाला म्हणाऱ्या विरोधकांवर भाजप नेते अमित मालवीयवर या प्रकरणी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. या ट्विटमध्ये मालवीय यांनी लिहिले की, “विरोधी पक्ष मोदींच्या भूतकाळातील गोष्टींवर नेहमीच त्यांना टार्गेट करतात. मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती-जमातीचा असणे हा अभिशाप आहे काय ?, असा प्रश्नही मालवीय यांनी उपस्थित केला आहे.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.