HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचे खासदार संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर

मुंबई | लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आज (११ फेब्रुवारी) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली होती. काकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहे. भाजपवर काकडेंनी टीका केली आहे. राष्ट्रवादीकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा काकडेंनी अजित पवारांकडे व्यक्त केली आहे.
काकडे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मला भावा माझ्यासारखे आहेत. परंतु भावानेच लाथ मारल्यावर दुसरे घर शोधायला तर हवेच ना असे सांगितले. तसेच दुसरी बाजूला ते असे देखील म्हटले की “मला भाजपकडून लोकसेभेचे तिकीट मिळेल, असा मला विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
तसेच मुख्यमंत्री माझा विश्वास खरा ठरवतील की नाही हे येणारा काळच सांगेल, असेही काकडे म्हणाले. पुण्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. त्यामुळे काँग्रेस जो उमेदवार देईल त्याचे काम करणार, असे अजित पवार यांनी काकडेंना सांगितले. तसेच पुण्यातून अपक्ष निवडणूक लढवणे सोपे नसल्याचा सल्लाही त्यांनी काकडेंना दिला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दाभोळकर-पानसरे कुटुंबियांना उच्च न्यायालयाने सुनावले

News Desk

अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून भाजपाचेच षडयंत्र !- नाना पटोले

News Desk

तालिका अध्यक्षांना शिवी कुणी दिली, हे योग्यवेळी सांगेन, फडणवीसांचा गौप्यस्फोट

News Desk