नवी दिल्ली | आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जाच्या देण्यासाठी आज (११ फेब्रुवारी) तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एकदिवसीय उपोषणास बसले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी देखील चंद्राबाबूंना पाठिंबा दिला आहे.
Madhya Pradesh CM Kamal Nath, Congress leader Digvijaya Singh and Shiv Sena MP Sanjay Raut at Andhra Pradesh CM & TDP Chief N Chandrababu Naidu's day-long fast in AP Bhawan,Delhi. pic.twitter.com/Nj6jZ0vmb9
— ANI (@ANI) February 11, 2019
विषेश राज्याच्या मागणीला दिग्गज नेत्यांचा पाठिंबा
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील सकाळी जावऊन चंद्राबाबू नायडू यांची भेट घेवून त्यांना पाठिंबा दिला आहे. “मी आंध्र प्रदेशच्या लोकांसोबत उभा आहे. मोदी हे कोणत्या प्रकारचे पंतप्रधान आहेत ? आंध्र प्रदेशच्या लोकांना दिलेले आश्वासन मोदींनी पूर्ण केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जातात तिथे ते खोटे बोलतात. त्यामुळे जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला आहे. मोदींनी राफेल विमान खरेदीत घोटाळा केला. चौकीदार चोर है’,” असे बोलत राहुल यांनी मोदींवर आरोपाच्या फैऱ्या साडल्या आहे.
Delhi: Congress President Rahul Gandhi at the Andhra Pradesh CM N Chandrababu Naidu's day-long hunger strike against the central government. pic.twitter.com/rKCjz9wz2l
— ANI (@ANI) February 11, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.