HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय चिटणीसपदाची जबाबदारी आमदार हेमंत टकलेंवर

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेबांसोबत गेली अनेक वर्ष आमदार हेमंत टकले हे राजकारण आणि सामाजिक,साहित्यिक,सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहेत. गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणारे आमदार हेमंत टकले यांच्यावर राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब यांनी राष्ट्रीय स्तरावरील चिटणीसपदाची आणखी एक महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.

विधान परिषद सभागृहामध्ये वेगवेगळया विषयांवर प्रभावी मांडणी करणे आणि त्या विषयाचे गांभीर्य सरकारपर्यंत पोचवण्याचा त्यांचा विशेष हातखंडा आहे. कला-साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील दांडगा अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. विधान परिषदेमध्ये पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणूनही ते काम करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नॅशनल रिलीफ फंडचे प्रमुख आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त म्हणूनही आमदार हेमंत टकल सध्या काम पहात आहेत.

आमदार हेमंत टकले यांची राष्ट्रीय चिटणीस म्हणून नेमणूक झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ,राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक आदींसह प्रदेशच्या वरिष्ठ नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूक आयोगाच्या ‘या’ निर्देशांविरोधात उद्धव ठाकरेंची सर्वोच्च न्यायालयात धाव

Aprna

चंद्राबाबूंच्या उपोषणादरम्यान एकाची आत्महत्या

News Desk

कर्नाटक निवडणुकीबाबत अजित पवारांचा गौप्यस्फोट

News Desk