HW News Marathi
राजकारण

दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार आज थंडावणार

मुंबई | लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज (१६ एप्रिल) थंडावणार आहेत. देशभरात १३ राज्यातील ९७ जागेसाठी निवडणूक होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील १० लोकसभा मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी १८ तारखेला मतदान नोंदवले जाणार आहे.

या टप्प्यात सोलापूरमधून सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधात होणारी प्रकाश आंबेडकरांची लढत पहायला मिळाला आहे. तर तर अमरावतीत शिवसेनेचे आनंदराव आडसूळ विरुद्ध नवनीत राणा असा सामना बघायला मिळणार आहे. शेवटच्या दिवशीच्या प्रचारासाठी अनेक राजकीय नेत्यांची लगबग बघायला पाहायला मिळत आहे.

तसेच नांदेडमध्ये अशोक चव्हाण रोड शो करणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर जाहीर सभा घेणार आहेत. तर सुशीलकुमार शिंदे सोलापुरात पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधणार आहेत. उदगीरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या उमेदवारासाठी सभा घेणार आहेत. तर अकोल्यात नितीन गडकरी प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात सभा घेणार आहेत.

महाराष्ट्रातील १० मतदारसंघात १८ एप्रिलला मतदान होणार

  • सोलापूर
  • नांदेड
  • लातूर
  • बीड
  • उस्मानाबाद
  • बुलढाणा
  • अकोला
  • अमरावती
  • हिंगोली
  • परभणी

दुसऱ्या टप्प्यात या १३ राज्यात ९७ जागांसाठी मतदान होणार

  • आसाम – ५
  • बिहार – ५
  • छत्तीसगड – ३
  • जम्मू काश्मिर – २
  • कर्नाटक – १४
  • महाराष्ट्र – १०
  • मणिपूर – १
  • ओदिशा – ५
  • तामिळनाडू – ३९ (सर्व)
  • त्रिपुरा – १
  • उत्तर प्रदेश – ८
  • पश्चिम बंगाल – ३
  • पुदुच्चेरी – १

Related posts

माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या छातीत संसर्ग

News Desk

शेतकऱ्यांचा संताप ओळखा, ठाकरेंचा भाजपाला टोला

News Desk

वाढदिवसा निमित्त उद्धव ठाकरेंवर राजकीय शुभेच्छांचा वर्षाव

News Desk