HW News Marathi
राजकारण

आठवलेंच्या मेणाच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उदघाटन

मुंबई | रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे उदघाटन शुक्रवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 3 वाजता मुंबई स्थित मलबार हिल येथे असलेल्या सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रामदास आठवले हे आंबेडकरी जनतेचे बहुजनांचे लोकनेते संघर्षनायक ठरले आहेत. त्यामुळे ते सर्व समाजात राष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय सेलिब्रिटी झाले आहेत. त्यांचा चाहता वर्ग अमाप असल्याने लोकप्रिय सेलिब्रिटींप्रमाणे रामदास आठवलेंचा मेणाचा पुतळा लोणावळ्यातील सुप्रसिद्ध वॅक्स म्युझियममध्ये उभारण्यात येणार आहे. वॅक्स म्युझियामचे प्रमुख सुनील कंडलूर या कलाकाराने रामदास आठवलेंचा हुबेहूब मेणाचा पुतळा बनविला आहे.

दलितांचे नेते म्हणून रामदास आठवले जगप्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांचा मेणाचा पुतळा आपल्या वॅक्स म्युझियम मध्ये उभारण्याची इच्छा होती. त्या पुतळ्याचा उदघाटन सोहळा मुंबईत व्हावा अशी आपली ईच्छा असल्याने शुक्रवारी मुंबईत या पुतळ्याचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती सुनील कंडलूर यांनी दिली आहे.

लोणावळ्यातील सुप्रसिद्ध वॅक्स म्युझियम मध्ये अनेक जगप्रसिद्ध लोकप्रिय व्यक्तिमत्वांचे मेणाचे पुतळे उभारण्यात आले आहेत. भारतीय लोकप्रिय राजकीय नेत्यांचे पुतळेही त्यात आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी; राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आदी मान्यवरांच्या मांदियाळीत संघर्षनायक केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंचाही मेणाचा पुतळा विराजमान होणार आहे. रामदास आठवलेंच्या मेणाच्या पुतळ्याचे उदघाटन शुक्रवार 18 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाल्यानंतर हा मेणाचा पुतळा लोणावळ्यातील वॅक्स म्युझियम मध्ये ठेवण्यात येणार आहे .

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धमकी आली हा म्हाडाच्या अध्यक्षांचा डाव !

News Desk

सत्ता नको, मला विरोधी पक्ष व्हायचंय !

Gauri Tilekar

योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ माफी मागावी | अशोक चव्हाण

News Desk