नवी दिल्ली | राजस्थान विधानसभा निवडणुकासाठीची मतदान प्रक्रिया ७ डिसेंबर रोजी पार पडली असून ११ डिसेंबर रोजी पाचही राज्यांचे निकाल जाहीर झाले होते. मात्र बसपाचे उमेदवार लक्ष्मण सिंग यांच्या निधनामुळे राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रामगड विधानसभा मतदारसंघासाठीच्या मतदानाला स्थगिती देण्यात आली होती. अखेर मंगळवारी (१ जानेवारी) निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी मतदानाची तारीख जाहीर केली आहे. या रामगड मतदारसंघासाठी २८ जानेवारी रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
“या निवडणुकीची अधिसूचना ३ जानेवारी रोजी जारी केली जाईल. बसपाचे उमेदवार ३ ते १० जानेवारी दरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करू शकतात. ११ जानेवारी रोजी छाननी होईल आणि १४ जानेवारी हि नामनिर्देशन मागे घेण्याची शेवटची तारीख आहे”, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी आनंद कुमार यांनी दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.