HW News Marathi
राजकारण

…तर मग तुम्ही हेडगेवार, गोळवलकर, नथुराम गोडसेच्या नावाने मतं मागून दाखवा !

नवी दिल्ली | “आम्ही महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधींच्या नावाने मतं मागू…मागणारच. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हेडगेवार, गोळवलकर, नथुराम गोडसेच्या नावाने मतं मागून दाखवावी. नाहीतरी तुमचे आणि त्यांचे विचार सारखेच आहेत”, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींच्या विधानाला प्रत्युत्तर दिले आहे.

“मी नुसते राजीव गांधींचे नाव घेतले तर त्यांच्या पोटात जोरदार दुखू लागले. त्यांनी नुसते रडणेच बाकी ठेवले आहे. मात्र, ते यावरून जेवढे रडतील तेवढेच जास्त जुने सत्य आजच्या पिढीसमोर येईल. जर राहुल गांधींमध्ये आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये हिंमत असेल तर निवडणुकीतील उर्वरित पुढचे दोन्ही टप्पे राजीव गांधी यांच्या मान-सन्मानाच्या मुद्द्यावर लढवून दाखवावेत”, असे खुले आव्हान पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला दिले होते. मोदी हे झारखंड येथील प्रचारसभेत बोलत होते. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रकाश आंबेडकरांकडून काँग्रेसची स्तुती, राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला

Gauri Tilekar

भाषण करून न दिल्यामुळे वसंत मोरे पुन्हा नाराज?

Aprna

…तर देशातील जनतेचा भाजपावर विश्वास राहणार नाही। रामदेव बाबा

News Desk