प्रयागराज | हिंदू धर्मा विरोधात कटकारस्थाने शिजत असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. भागवत यांनी शबरीमला मंदिरावरूनही केरळ सरकावर टीका केली आहे. भागवत यांनी प्रयागराज येथील कुंभमेळ्यामध्ये धर्म संसदेने आयोजित करण्यात आलेल्या सभेत संबोधित करताना बोलत होते.
M Bhagwat:Court ne kaha mahila agar parvesh chahti hai to karne dena chaiye,agar kisiko roka jata hai to usko suraksha dekar jahan se sab darshan karte hain vahan se le jana chaiye.Lekin koi jana nahi chah raha hai isliye SriLanka se lakar,peeche ke darwaze se ghusaya ja raha hai pic.twitter.com/RZZSrMpq1k
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 31, 2019
“शबरीमलाच्या मंदिरात महिलांना प्रवेश देण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे. तेव्हा ज्या महिलांला मंदिरात अय्यपांच्या दर्शनासाठी जायची इच्छा असेल त्यांना जाऊ द्यावे. जर कोणी अडवत असेल तर सुरक्षा देऊन त्यांना मंदिराच्या आत घेऊन जावे. परंतु कोणत्याच हिंदू महिलांना मंदिरात दर्शनाला जायची इच्छा नाहीये. तेव्हा काही लोकांनी श्रीलंकेतून महिलांना आणून मंदिरात घुसवत आहेत. या गटांना हिंदू धर्मात स्त्री-पुरुषांमध्ये फूट निर्माण करायची आहे. त्यासाठी विविध कट रचले जात आहेत. नवीन बेत आखले जात आहेत” असे टीकास्त्र भागवतांनी केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.